What Our Patients Say

Healing Stories from Our Patients

What Our Patients Say

Wellness That Speaks for Itself

ऑगस्ट 2018 मध्ये उपचार चालु केले. पाळी ऑलमोस्ट बंदच होती म्हणजे जेव्हा पिल्स घेणार तेव्हाच पाळी यायची अशी परिस्थिती. Vaginal dryness & severe Vaginal burning या दोन तक्रारी साठी उपचार घेतले व उपचार चालु असतांनाच मार्च 2020 मध्ये नैसर्गिक रित्या गर्भधारणा झाली. पुढील ९ महिने सरांकडेच उपाचार घेतले आणि डिसेंबर 2020 मध्ये मुलगा झाला. सरांनी दिलेल्या उपचारांमुळे मुलगा एकदम हुशार. तसेच तो खुप ऍक्टिव्ह आणि बाकी मुलांपेक्षा खुपच sharp memory आहे. मला असे वाटू लागले होते की मला मुल होण्यासाठी खुप उपचार घ्यावे लागतील, पण सरांनी ते इतक्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने माझ्या आयुष्यात इतका मोठा आनंद दिला आहे त्याबद्दल त्यांचे खुप आभार.

सौ काजल पाटील (वय - 28 वर्षे)
Infertility & PCOD

नमस्कार मी अश्विनी आव्हाड. मला वेरिकोज व्हेन्सचा त्रास होता व ट्रीटमेंट घेत असूनही नंतर तो वाढतच गेला. दोन-तीन वेळा छोट्या-मोठ्या सर्जरीज करूनही जखमा भरून येत नव्हत्या. नंतर नंतर तर जखमांचा आकार अगदी दहा सेंटिमीटर पर्यंत वाढत गेला व सततचे पाणी येणे पस होणे होणे या गोष्टींनी मी हैराण झाले. दोन वर्षे आम्ही विविध ठिकाणी उपचार घेतले होते. पण फरक पडत नव्हता. मग एका परिचित व्यक्तीकडून आम्हाला डॉ. नितीन पांडव यांच्या बद्दल समजले व आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या शुद्ध आयुर्वेदिक उपचाराने माझा पाय पूर्ण बरा झाला व नंतर मला आज तागायत पायांना कुठलीही जखम झालेली नाही. यासाठी मी डॉ. पांडव यांचे मनःपूर्वक आभारी आहे.

सौ अश्विनी आव्हाड (वय - 46 वर्ष)
Varicose Ulcers & Wound Infection.

मी जानेवारी २०१७ पासून डॉ पांडव सरांकडे ट्रिटमेन्ट घेण्यासाठी येत आहे.. मी पहिल्यांदा जेव्हा सरांकडे आली तेव्हा माझ्या दोन्ही गुडघ्यांच्या वेदना, सूज व उभ राहणे या गोष्टींनी मी अत्यंत त्रस्त झाले होते व मला नोकरी सोडावी लागेल की काय अशी भीती वाटू लागली होती. सरांना भेटण्यापूर्वी मी माझ्या गुडध्यावर इलाज करण्यासाठी अनेक नामवंत ऑर्थोपेडिक तज्ञांना दाखवले होते. गुडघ्यांचे ऑपरेशन करण्याची वेळ माझ्यावर आली होती. पण डॉ पांडव सरांच्या आयुर्वेदिक औषधांमूळे व उत्तम सल्ल्यांमुळे मुळे मी आज ऑपरेशन न करताही अतिशय व्यवस्थित आहे. आज मला कुठलाही त्रास जाणवत नाही. त्यामुळे मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानते.

सौ अनिता वसंत भामरे (वय - ५३ वर्षे)
संधिवात

मी विभा शिवपुत्र मुड्डी राहणार पालघर. माझ्या आजाराविषयी बोलायचं झालं तर जन्मजात असं मला कोणताच आजार नव्हता. माझ्या कॉलेज काळात मी बारावीला असताना माझे एक्सीडेंट झाले होते. त्यावेळेला माझ्या पोटामध्ये मार बसला होता त्यानंतर मला मुंबई येथील के एम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले. काही दिवसांनी मला घरी सोडण्यात आले त्यावेळेला माझी प्रकृती व्यवस्थित होती. परंतु त्यानंतर मला एका अशा आजाराने ग्रासले की, काहीही खाल्ल्यानंतर मला उलटी व्हायला सुरुवात झाली. उलटी होण्याचा त्रास जवळपास मी चार ते पाच वर्षे काढला व नंतर नंतर माझे वजन खूपच खालावले. उलटी होण्याच्या आजारातून बाहेर येण्यासाठी मी मुंबई येथील के एम रुग्णालय, जे जे रुग्णालय, विरार येथील संजीवनी रुग्णालय, वापी येथील विनोबा भावे रुग्णालय, सेलवास येथील रुग्णालय आणि मी राहत असलेल्या पालघर बोईसर मधील जवळपास सर्वच रुग्णालयात मी उपचार घेतले परंतु माझ्या आजाराचे कोणतेच निदान त्यांना करता आले नाही. ह्या उपचारादरम्यान माझी शारीरिक व मानसिक स्थिती खूप खालावली होती. ह्या आजारादरम्यान मला माझ्या मामाच्या मुलाने मला नाशिक येथील डॉ. नितीन पांडव सरांच्या आयुर्वेदिक दवाखान्याबद्दल सांगितले. पहिल्यांदा जेव्हा मला त्यांच्या क्लिनिकला नेण्यात आले तेव्हा मला त्यांच्या क्लिनिकला चालत जाण्याची सुद्धा ताकद नव्हती. जेव्हा मी त्यांच्या क्लिनिकला पोहोचले तेव्हा त्यांनी नाडी परीक्षण करून माझ्या आजाराचे योग्य निदान लक्षात घेऊन आयुर्वेदिक पद्धतीने माझ्यावर उपचार सुरू केले. त्यांनी दिलेल्या औषधातून असा चमत्कार झाला की, औषध घेण्याच्या तिसऱ्या दिवशी मी पोट भरून जेवले आणि मला कुठल्याही प्रकारची उलटी झाली नाही. त्यानंतर त्यांनी दिलेली औषधे मी व्यवस्थित मी व्यवस्थितरीत्या घेतली. औषधे घेत असताना त्यांनी दिलेली पथ्य सुद्धा पाळली. डॉक्टर पांडव सरांनी दिलेल्या आयुर्वेदिक औषधांनी अशी काही जादू केली की मी अवघ्या तीन महिन्यात ह्या आजारातून बाहेर पडले. व आज मी एक सुदृढ व निरोगी आयुष्य जगत आहे. ह्या आजारातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी माझी ट्रीटमेंट डॉ. नितीन सरांकडे काही वर्षे चालू ठेवली. आज माझं लग्न होऊन तीन वर्षे झाली आहेत व मला दोन वर्षाचा सुदृढ मुलगा सुद्धा आहे. मी माझे वैवाहिक आयुष्य खूप आनंदाने जगत आहे. डॉ. नितीन पांडव सरांचा आजारावरचे योग्य निदान ठरवून त्या आजारावर योग्य ती उपचार पद्धती करण्याचा जो अनुभव आहे तो मी इतर कुठल्याच डॉक्टरांकडे बघितला नाही. माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद ही फक्त देवाकडे आहे. मला पुनर्जन्म दिल्याबद्दल मी डॉ. नितीन पांडव सरांचे खूप खुप आभार मानते. त्यांचे हे ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

सौ विभा शिवपुत्र मुड्डी (वय - 33 वर्षे)
Hepatomegaly, Reflux Oesophagitis & Anaemia

I had fissures, piles and a lot of pain at that site. It was so unbearable that I couldn't even sit properly. I took a lot of treatment from many Doctors & even undergone a minor surgery. But, instead of getting cured it worsened very badly. Then I went to Dr Pandav sir & with his medicinal treatment, all my problems got completely solved. Now, I am living a healthy life.

Ms. Sanjana Roy (Age - 24years)
Piles & Fissure

My son Yash got a toothache & Fever when he was 6 years old and he got better after taking treatment from a nearby doctor. However, later he started complaining of swelling on his face, swollen eyes, loss of appetite and fever again. The doctor asked us to do blood and urine tests and it was diagnosed that he was suffering from Severe Protein urea in his urine, which is called Nephrotic Syndrome & it's a Serious issue. Therefore, the doctor advised us to immediately see a kidney specialist. Accordingly, we showed him to a nephrologist at KEM Hospital in Mumbai. He gave Yash some medicines but protein in his urine continued to pass. By this time, 4-5 months had passed but Yash was not getting relief and no proper diagnosis was made. Therefore, the doctor decided to do a biopsy. At that time, we were scared and on the advice of one of our close relatives, we met Dr. Pandav in Nashik. After that, Dr. Pandav Sir examined Yash and gave him the treatment that gradually reduced Yash's protein in urine and the associated symptoms got subsided. We continued the treatment for next 2-3 months till it got completely resolved. However, as per his advice, we continued the treatment for the next three to four months and then continued to visit him once a month and today Yash is fifteen years old and till date he has not had any such complaint again and his Nephrotic Syndrome has been completely cured. We are very grateful to Sir for curing him.

Mr Yash Sonar, Mumbai (Age - 6years)
Nephrotic Syndrom (Protein Urea)